विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच बौद्ध मंदिर आहे. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते.