ब्राझीलची लोकसंख्या आणि भौगोलिक आकार किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात.