द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला.
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली.
इसवी सन 1600 मध्ये मछलीपट्टनम ( सध्याचे आंध्रप्रदेश राज्य, जिल्हा कृष्णा ) येथे पहिली फॅक्टरी स्थापन केली गेली.
काळरेषा :
December 31, 1600, स्थापना 125 भागधारक, आणि भांडवल £72,000
१६०८ सुरतेस आगमन
१६११ मछलीपट्ट्न
१६१२ सुरतेची वखार
१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी प्राप्त
१६१५ सर थॉमस रो यांना जेम्स प्रथम यांनी मुघल सम्राट जहांगीर (अफगाणिस्तानासह बहुतेक उपखंडात राज्य करणारे) भेट देण्याची सूचना केली होती. या अभियानाचा उद्देश असा होता की व्यापारी कराराची व्यवस्था करणे ज्यायोगे कंपनीला सूरत व इतर भागात कारखाने राहण्याचे व बांधकाम करण्याचे विशेष अधिकार मिळतील. त्या बदल्यात कंपनीने सम्राटाला माल आणि युरोपियन बाजारावरील भेदभाव देण्याची ऑफर दिली. हे अभियान अत्यंत यशस्वी झाले आणि जहांगीर यांनी सर थॉमस रो यांच्यामार्फत राजाला एक पत्र पाठवले.
१६३९ मद्रास वखार
१६४७ पर्यंत २३ वखारी ९० कर्मचारी
१६६८ मुंबई वखार
१६७० सैन्य बाळगण्याचे, युद्धाचे ब्रिटीश अधिकार
१६९० कलकत्ता वखार
१७१७ मुगल बादशहाकडून व्यापारास कर माफी
१७५७ प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हचा विजय
१७६० फ्रेंचांपेक्षा वरचढ
भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणापेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तरीसुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्धा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला लागायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धांनी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळेच. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती.
ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDPच्या २% इतका होता. म्हणजे त्या दृष्टीकोनातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडसाठी इतकी महत्त्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणासाठी खर्च होत होता आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती?
✅ Updated recently