द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात ३१ डिसेंबर १६०० मध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश्य ईस्ट इंडिज प्रदेशात व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला.