भांडवलशाही : ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते.
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.
वैशिष्ट्ये
उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे.
उद्योग - व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात.
ग्राहक हे " सार्वभौम " असतात,कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.
उपभोक्ते ग्राहक से सार्वाभौम आसतात कारण त्याच्या पहनती नुसारच उत्पादन केले जाते
दोष
आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते.
जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी,बेरोजगारी,कामगार कल्याण,पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही.
चैनीच्या व निम - चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो.
अशा अर्थव्यवस्थेत तेजी - मंदीची व्यापारचक्रे येत असतात.तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदीदरम्यान बेरोजगारीत वाढ होते.
भांडवलशाही अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणासाठी वापरली जाते?
✅ Updated recently