व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो.