बांगलादेश हा डिसेंबर 1971 पर्यंत पाकिस्तानचा भाग होता. पूर्वी हा भाग पूर्व पाकिस्तान नावाने ओळखला जात असे. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानात विद्रोह झाला. एका रक्तरंजित संघर्षानंतर बांगलादेश नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र उदयाला आलं