जानेवारी 2022 मध्ये भारताची एकंदर निर्यात( व्यापारी आणि सेवा एकत्रितपणे) 61.41 अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षीच्या याच काळातील निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात 36.76 टक्के जास्त आहे. तर जानेवारी 2020 च्या तुलनेत 38.90 टक्के जास्त आहे. जानेवारी 2022 मध्ये भारताची एकंदर आयात 67.76 अब्ज राहण्याचा अंदाज आहे.