लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान भारताचे नवे CDS असतील. ते लष्करी विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होतं. गेल्या वर्षी आठ डिसेंबरला देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता