भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.