आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते. सीएसई तीन टप्प्यांत घेतली जाते - प्रिलिम्स, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी यानंतर केंद्र प्रत्येक सेवेतील आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) पाठवते. त्यानंतर युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून आवश्यक संख्या भरती करते. शेवटी, यूपीएससीने नियुक्त केलेले अधिकारी देशाचे राष्ट्रपती नियुक्त करतात, त्यानंतर त्यांची नेमणूक करण्याचे अधिकार भारत सरकारला मिळतात.