ब्राझीलची ती राष्ट्रभाषा असून शिवाय आफ्रिका, आशिया, ओशिआनिया, अमेरिका यांच्या काही भागांतही ती वापरली किंवा बोलली जाते. भारतातील गोवा, दीव, दमण इ. प्रदेशांत पूर्वी पोर्तुगीज राजवट होती आणि तेथे पोर्तुगीज ही सरकारी कामकाजाची भाषा होती. अजूनही काही लोक या भागात पोर्तुगीजचा वापर करतात.