सामान्यतः विनिमय दर तीन प्रकारे ठरविले जातात - स्थिर विनिमय दर, तरता विनिमय दर आणि अधिकीलित विनिमय दर. देशाच्या मध्यवर्ती बँकेने ठरविलेल्या आणि राखलेल्या दराला स्थिर विनिमय दर म्हणतात. या उलट चलनाचा विनिमय दर जेव्हा बाजारातील चलनाच्या मागणी आणि पुरवठा यावरून ठरतो तेव्हा त्याला 'मुक्त'/ तरता विनिमय दर म्हणतात.