शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यास बेरोजगारी वाढेल, पशुधन व मानवी शक्तीची उपेक्षा होईल, व्यक्तिगत प्रेरणा व लाभ राहणार नाहीत, दुय्यम दर्जाची वागणूक मिळेल, या समजुतीमुळे व सहकारी शेतीला पोषक वातावरण नसल्याने भारतात सहकारी शेतीचे प्रयोग फारसे यशस्वी झालेले नाहीत.