भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा संस्थापक कोण होते?
✅ Updated recently
हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी अधिकृत परवानगी दिलेल्या व्यापारी कंपन्या. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदर्लंड्स) फ्रान्स, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, ऑस्ट्रिया, स्वीडन इ. राष्ट्रांत अतिपूर्वेकडील व्यापाराविषयी स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे उपर्युक्त देशांनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया कंपन्यांपैकी ब्रिटिश, डच व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांनी अतिपूर्वेकडील राष्ट्रांमध्ये व्यापाराबरोबर साम्राज्य स्थापन करण्यातही यश मिळविले.ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती