श्रमविभाजनाचे प्रमाण अर्थव्यवस्थेत पुष्कळच वाढले व मोठमोठे कारखाने अस्तित्वात येऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. यामुळे सुरुवातीस जरी शहरांतील कामगारांचे व नागरिकांचे जीवन रटाळ व दरिद्री झाले, तरी नागरीकरणाचा अंतिम परिणाम औद्योगिकीकरणाद्वारे शहरवासीयांचे राहणीमान सुधारण्यात झाला.