सुचेता कृपलानी (पूर्वाश्रमीच्या मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ. स. १९०८- १ डिसेंबर १९७४) या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. १९६३-६७ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.