भारतामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे का?
✅ Updated recently
इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ़ संकेतांच्या आधारे चालतो. 'पार्लेंमेंट' ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लेमेंटवर आधारित पार्लेमेंटरी शासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासनपद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे.