केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे.
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे. आता ते २०२४ पर्यंत केंद्रीय बँकेचे गव्हर्नर राहतील. उर्जित पटेल यांच्या जागी डिसेंबर २०१८ मध्ये दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दास यांची १० डिसेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
भारतीय गव्हर्नर कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.