स्वातंत्र्योत्तर काळातील चंडीगढ शहराची ल कॉर्ब्यूझ्येने आधुनिक शैलीमध्ये केलेली नगररचना (१९५०) ही एक महत्वपूर्ण घटना होय. सलोह काँक्रीट हे त्याचे प्रमुख माध्यम होते. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय वास्तुकला प्रचारात आली, असे म्हणता येईल.