आकलन हा भाषा विकासाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये समोरच्याला काय म्हणायचे आहे ते आपल्याला कळते. समोरच्याच्या आवाजातील रागीटपणा, कोमलपना सारखे भाव आपल्याला समजतात. आकलन केल्याने आपण समोरच्याच्या सुचना समजु शकतो आणि त्यांचे पालनही करू शकतो.