भाषा शिकवणे म्हणजे भाषा शिकण्याची क्रिया मुद्दाम घडवून आणणे. आता भाषासंपादनाची ही क्रिया स्वाभाविक रीतीनेदेखील घडून येऊ शकते. लहान मूल वयाच्या २ ते ७ वर्षे ह्या मुदतीत सामान्यतः एक बोली शिकते.