शैली ही केवळ भाषेशी संबंधित नाही. शैली म्हणजे केवळ अलंकरण नव्हे. शैलीचा संबंध अनुभवाचे संकलन, विषयाचे आकलन, कलाकृतीची रचना, आकृतिबंध, आविष्काराची रीत, आस्वादाचीही रीत यांच्याशी लावता येतो..." इत्यादी घटकांचा संबंध शैलीशी येतो. आधीच्या काळात शैली म्हणजे साहित्यातील बरेच बाह्य घटक मानले जायचे.