'भू' म्हणजे जमीन आणि भू-परिसंस्था म्हणजे जमिनीवरची परिसंस्था. ज्या परिसंस्था ह्या भू-भागावर म्हणजेच जमिनीवरच असतात, किंवा अस्तित्वात येतात त्यांना 'भू' परिसंस्था असे म्हणतात. पृथ्वीवरील अजैविक घटकांचे वितरण हे भूतलावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या परिसंस्था तयार झाल्या आहेत.