मक्तेदारीच्या परिस्थितीत मक्तेदाराच्या उत्पादित वस्तूची मागणी अलवचिक असते. त्यामुळे मक्तेदाराला वस्तूच्या पुरवठ्याचे नियंत्रण करून आपले स्वतःचे किंमत परिमाणविषयक धोरण स्वीकारता येते व आपला निव्वळ मक्तेदारी नफा अधिकतम करता येतो. मूल्यभेदन हे मक्तेदारीचे आणखी एक वैशिष्ट्य होय.