सामान्यतः माणसाचे दिसणे जर चारचौघांच्यात उजवे ठरले तर त्याला चांगले व्यक्तिमत्व समजले जाते. म्हणजे एखादा गोरागोमटा, उंचापुरा, उत्तम शरीरयष्टी असणारा माणूस चांगल्या अद्ययावत राहणीमानानुसार टापटीप रहात असेल तर सामान्यतः चांगले व्यक्तिमत्व असणारा आहे असे मानले जाते.