शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे. याच जिल्ह्यात बिबी का मकबरा, अजिंठा - वेरूळ लेण्या,दौलताबाद किल्ला आणि जायकवाडी धरण आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत.