सामान्यत: छत्रपती शाहूनंतर सर्व किंवा एकेकटा सरदार स्वत:स मराठा राजमंडळ असे संबोधी. अशा सर्व सरदारांचे मिळून राजमंडळ होई. शिवाजी महाराज लोकविलक्षण योद्धे आणि अजब कारभारी होते. यांमुळे त्यांनी दैनंदिन कार्याच्या विभागणीसाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले, तरी त्यायोगे लक्षात येण्यासारखे मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही.