१९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते. मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) यांनी त्यांच्या १ वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत यांना दिले होते.