हाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावाची ओळख आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज येथेही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचं समोर आलं आहे. आंबोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारं ठिकाण आहे. आंबोली गावाला महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हटलं जातं.