सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा, ऐन हे वृक्ष आढळतात.