महिलांमध्ये उद्योजकता रुजल्याशिवाय घराघरात उद्योजकता रुजणार नाही. कुटुंबातील एक स्त्री उद्योजक झाली तर उद्योजकतेचे संस्कार ती आपल्या कुटुंबावर करेल. तिच्या उद्योजकीय संस्कारातून भावी पिढी उद्योजकीय होईल. उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे सारे गुण तिला निसर्गाने बहालच केले आहेत.