मागणीची वृद्धी झाली असल्यास नवी मागणी रेषा मूळ मागणी रेषेच्या उजव्या (वरच्या) बाजूस असते. आकृतीत 'म२ म२' ही मागणी रेषा मागणीची वृद्धी दाखविते. जेव्हा दिलेल्या किंमतीत, 'बक'या किंमतीत, वस्तूची मागणी वाढलेली असते म्हणजे मागणी 'अक' पासून 'अग' पर्यंत वाढते, तेव्हा मागणीची वृद्धी झालेली असते.