मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता या संकल्पनेचा वापर केला आहे . " वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या शेकडा बदलाचे प्रमाण म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता होय . " या वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो .