माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते.