जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व त्यावरून कोणते खत वापरावे, किती खत वापरावे, कोणते पीक घ्यावे ही माहिती आपल्याला माती परीक्षण केल्याने समजते. - माती परीक्षणाचे निष्कर्ष योग्य येण्यासाठी आपल्या शेताचा प्रातिनिधिक मृद नमुना घेणे ही माती परीक्षणातील प्राथमिक परंतु अत्यंत महत्त्वाची बाब आहे.