मानव हा एकमेव प्राणी का उत्क्रांत झाला?
✅ Updated recently
मानव आणि चिंपँझी एकाच पूर्वजांपासून उद्भवले असावेत. साधारणपणे ८०–६० लाख वर्षांपूर्वी होमिनिडी कुलातील प्राण्यांची विभागणी चिंपँझी आणि आदिमानव अशा दोन गटांमध्ये झाली. ही उत्क्रांती बव्हंशी आफ्रिका खंडात घडून आली. ६०–२० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आदिमानवाचे जीवाश्म आफ्रिकेत सापडले आहेत.