हवामान
मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ४०° से. ते किमान १०° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७°से असे नोंदवले गेले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पावसाचे वार्षिक सरासरी किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.