बृहन्मुंबईच्या बरोबरीने वाढणारे पुणे आता मुंबईला मागे टाकून भौगौलिकदृष्ट्या 'महापुणे' ठरले आहे. आजमितीस शहराचे असलेले २४३ चौरस किलोमीटर पुण्याचे क्षेत्रफळ तब्बल ५६० चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ सुमारे साडेचारशे चौरस किलोमीटर आहे.