मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे(CEO ) अधिकार व कार्ये :

१) जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे.

२) जिल्हा परिषदेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे.

३) वर्ग -१, वर्ग -२ च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे.

४) जिल्हा परिषदेच्या वर्ग -३ व वर्ग -४ च्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.

५) अधिकारी वर्ग रजेवर असताना त्या जागी हंगामी नियुक्त्या करणे.

६) जिल्हा परिषदेच्या फंडातून (जिल्हा निधीतून) रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे.

७) जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून तो कोणत्याही कामाबद्दलची माहिती, अहवाल वा हिशेब मागवू शकते.

८) जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समितीस सादर करणे.

९) जिल्हा परिषदेवर एकापेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO) असतात. त्यापैकी एकार
जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस आहे

१०) जिल्हा परीषदेतील महत्वाची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या ताब्यात असतात.