नाट्यशास्त्रानुसार मुद्रा म्हणजे मनातील विशिष्ट भाव-भावना, संवेग, चित्तवृत्ती इत्यादी व्यक्त करण्यासाठी केलेला शारीरिक — विशेषत: मौखिक व हस्त — अभिनय होय. देव-देवतांच्या तसेच गौतम बुद्धादी अनेक योगी व मुनींच्या प्रतिमांमध्ये अभय-मुद्रा, ज्ञान-मुद्रा इत्यादी मुद्रा ठळकपणे दिसून येतात.