मुलांचे अवधान (लक्ष केंद्रित करण्याची क्षमता) विकसित होण्यासाठी प्राथमिक शिक्षणातील ही वर्षे महत्त्वाची असतात. शिक्षण हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे पण त्या बरोबरीने भावनिक विकासाकडे लक्ष दिले तरच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नातेसंबंध दृढ होतील.