फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा या पहिल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोहिमेमध्ये (१५०५) मॅगेलन सामील झाला. या मोहिमेचे उद्देश भारतात स्थापन करण्यात आलेल्या पोर्तुगीज तळांचे एकत्रीकरण करणे, तसेच हिंदी महासागरातील व्यापारमार्गावर स्वामित्व प्रस्थापित करणे, असे होते.