मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलॉंग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले.