मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा रीतीने पिढ्यान्‌पिढ्या जतन केली जाते. कित्येक लोककथा ह्या एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, तसेच एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कतीत प्रवास करतात व अशा प्रवासात त्यांची रूपेही बदलत जातात.