मौर्य साम्राज्याच्या सीमा खूप दूरवर पसरलेल्या होत्या. इतक्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे आणि प्रशासन व्यवस्थित ठेवणे हे एक टया राजाला शक्य नव्हते. त्याकरिता राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी मंत्र्यांची परिषद असे. या मंत्रपरिषदेत बारा ते वीस मंत्र्यांचा समावेश असे.