रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे, 68 लाख युक्रेनी नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आली आहे. ही संख्या युक्रेनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता 15 टक्के आहे. युक्रेनमधील प्रत्येक 6 माणसांपैकी एकाला देशातून पलायन करण्याची वेळ आलीये. UNHRCच्या अहवालानुसार या 68 लाख नागरिकांपैकी 36 लाख युक्रेनी हे पोलंडला पोहचले आहेत.