भूवैज्ञानिक इतिहास : भूवैज्ञानिक दृष्ट्या यूरोप हे तुलनेने अलीकडच्या काळात निर्माण झालेले खंड आहे. संशोधनावरून असे आढळून आले आहे की, या खंडाच्या निर्मितीची प्रक्रिया सु. ५७ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली असावी.