युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे.