रंगमंच म्हणजे ज्या भूमीवर किंवा जागेवर प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग होतो ती जागा. याला रंगपीठ किंवा इंग्रजीत स्टेज असे म्हटले जाते. रंगमंचविषयक कल्पना देशकालपरत्वे सतत बदलत गेलेल्या आहेत. रंगमंचासंबंधीचा प्राचीन काळातला विचार भारत आणि ग्रीस देशांत झालेला आढळतो.